PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 18, 2024   

PostImage

Korchi accident: दोन ट्रकची धडक, चालक ठार


कोरची : दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक होऊन एक चालक जागीच ठार झाला तर क्लीनर जखमी आहे. ही घटना १७ जानेवारीला मोहगावजवळ दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. मृतदेह केबिनमध्ये अडकल्याने तो काढण्यासाठी कसरत करावी लागली.

 

राजूलाल मोहम्मद देवाण (५०,रा. खजुरिया, बिहार) असे मयताचे नाव आहे. तो छत्तीसगडहून आंध्र प्रदेशकडे ट्रकमध्ये (सीजी १० एटी-५४८२) - ताडपत्री घेऊन जात होता. समोरून अल्युमिनियमचे साहित्य घेऊन ट्रक - (केए ०१ एएम-४५२८) छत्तीसगडकडे - जात होता. चालकांचा वाहनांवरील ताबा सुटल्याने कोरचीपासून दोन

कीलोमीटर अंतरावरील मोहगावजवळ दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात एक ट्रक उलटला. त्यातील चालक राजूलाल देवाण याचा जागीच मृत्यू झाला तर क्लीनर जखमी आहे.

 

 

 

दुसऱ्या ट्रकचा चालक फरार झाला, को मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. कोरची पोलिसांनी धाव घेतली, अपघातग्रस्त ट्रक बाजूला हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 10, 2024   

PostImage

चक्क.. तिघांना दिली दुचाकीने धडक.! एकाच मृत्यू तर दोघे जखमी.! …


अहमदनगर:-

सध्या हिवाळ्याचे दीवस सुरु असून सकाळी मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या तीन युवकांना मोटारसायकलने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहे.अनिकेत महादेव अकोलकर असे मृत युवकाचे नाव असून फुलारी व चितळे हे दोन गंभीर जखमी झालेल्या युवकांचे नाव आहेत. जखमी दोघांना  उपचारासाठी नगरला दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोद केली आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना शेवगाव रोडवर हॉटेल निवांत समोर घडली आहे. काल मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास डांगेवाडी शिवरात हॉटेल निवांत समोर रस्त्यावर व्यायाम करणारे अनिकेत अकोलकर,फुलारी व चितळे यांना मोटारसायकलने जोरात धडक दिली. यामध्ये अनिकेत महादेव अकोलकर हा ठार झाला तर चितळे व फुलारी दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे फिरायला येणारे युवक तातडीने धावले व जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे. पहाटे फिरायला जाणारे व व्यायामासाठी रस्त्यावरच उतरणाऱ्यांनी या घटनेतून बोध घेण्याची गरज आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहायक फौजदार अमोल आव्हाड पुढील तपास करीत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 28, 2023   

PostImage

साक्षगंधाकरीता जात असतांना वाहनाचा भीषण अपघात.!दीड वर्षीय बालकासह दोन महिला …


गोंदिया,:-

 तिरोडा- गोंदिया मार्गावर भरधाव टवेरा वाहनास झालेल्या अपघातात दीड वर्षीय बालक व दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर इतर लोक जखमी झाल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे करटी(तिरोडा) व मजीतपूर येथे शोककळा पसरली आहे.

तिरोडा तालुक्यातील करटि येथील एका कुटुंबाचे गोंदिया जिल्ह्यातील मज्जिदपूर येथे लग्न ठरल्याने साक्षगंधा करता टवेरा क्रमांक एम. एच. 40 ए 4243 ही 16 लोकं घेऊन मजीदपूरकडे जात असता भरधाव वेगाने जाणारी टवेरा वाहनाचे संतुलन बिघडल्याने वाहन चार-पाच पलट्या मारत रस्त्याचे बाजूला एका खांबावर व विटाचे भिंतीवर जाऊन आढळल्याने वाहनातील 13 ईसम जखमी होऊन एक महिला व छोटा बालक बाहेर फेकल्या गेले. त्यामुळे वाहनातील छाया अशोक ईनवाते (50) अनुराधा हरिचंद कांबळे (50 ) दोन्ही राहणार करटि व देवांश विशाल मुळे दीड वर्ष करटि या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनचालक अतुल नानाजी पटले 23 राहणार अर्जुनी, गीताप्रीतीचंद ईनवाते 55 करटि, पदमा राजकुमार इनवाते 50 भूराटोला, बिरजूला गुडन ठाकरे 35 बालाघाट अहिल्याबाई नामदेव कोडवते 62 करटि, गंभीर जखमी झाले तर इतर किरकोळ जखमी झाल्याने गंभीर जखमींना गोंदिया केटीएस रुग्णालयात उपचाराकरता पाठवण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच गंगाझरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश बनसोडे व तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कठाळे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. फिर्यादीचे तक्रारीवरून गंगाझरी पोलीस स्टेशन येथे वाहन चालका विरोधात कलम 279 ,304 अ,338 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास गंगाझरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश बनसोडे करीत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे करटी व मजीतपूर परिसरात शोककळा पसरली आहे.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 4, 2023   

PostImage

Khasdar Ashok Nete News ; खासदार अशोक नेते यांच्या गाडीला …


 

चिमूर प्रतिनिधी :-

         गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते शनिवारी नागपूरवरून गडचिरोलीच्या दिशेने येत असतांना विहिरगांवजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात गाडीचे थोडे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झालेली नाही. आपण सुखरूप असल्याचे खा.अशोक नेते यांनी सांगितले.

            खा.नेते मुंबईवरून रात्री १२.१५ च्या सुमारास नागपूरला पोहोचल्यानंतर सकाळी ते आपल्या वाहनाने (एमएच ३३, एए ९९९०) गडचिरोलीकडे निघाले होते. सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील विहिरगांवजवळ समोरच्या ट्रकने अचानक वळण घेतले. त्यामुळे त्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या खा.नेते यांच्या वाहनचालकाने गाडीवरील नियंत्रण सुटू न देता तातडीने ब्रेक लावले. पण त्या प्रयत्नात ट्रकच्या एका कॅार्नरला मागून हलकीशी धडक बसली. त्यात खा.नेते यांच्या वाहनाचे थोडे नुकसान झाले. मात्र नेते यांच्यासह त्यांच्या वाहनातील कोणालाही इजा झाली नाही,

          यानंतर दुसऱ्या वाहनाने खा.नेते गडचिरोलीकडे निघाले. गडचिरोलीत पोहोचल्यानंतर ते आपल्या मतदार संघातील नियोजित दौऱ्यासाठीही रवाना झाले. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी खा.नेते यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. ईश्वरी कृपेने कोणालाही दुखापत झालेली नाही, असे खा.नेते यांनी सांगितले.
लोकसभा क्षेत्रातील जनतेचे प्रेम व आपुलकी जिव्हाळा सदैव माझ्या पाठीशी आहेच.जनतेनी दिलेल प्रेम माझ्या  हृदयात असून आपुलकीची भावना मी या प्रसंगी व्यक्त करतो.